मुंबई, दि. ५ : स्वातंत्र्य दिन हा अतिशय महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी एक आहे. हा सोहळा साजरा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर प्रत्येक बाबीचे काटेकोर नियोजन करावे, कुठेही नियोजन चुकणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
मंत्री श्री. रावल यांनी मंत्रालयात स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह राजशिष्टाचार, सार्वजनिक बांधकाम, पोलीस आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. रावल म्हणाले, स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा त्याबरोबरच शिस्त आणि परंपरा काटेकोर पाळली जाईल, याची दक्षता घ्यावी. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी त्याचबरोबर सर्व निमंत्रितांचा सन्मान ठेवावा. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने जिल्हास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठीची यादी वेळेत प्रसिद्ध करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी राजशिष्टाचार विभागामार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तसेच पोलीस महानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस यंत्रणेमार्फत घेतल्या जाणाऱ्या दक्षतेबाबत माहिती दिली. उपसचिव हेमंत डांगे यांनी प्रस्तावनेत मंत्रालयात आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.
00000
बी.सी.झंवर/विसंअ