उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खतगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

नांदेड, दि. 6 ऑगस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नांदेड शहरातील साई निवास बाबानगर नांदेड येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पत्नी कै. सौ. स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे अलिकडेच निधन झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या त्या भगीनी होत्या.

यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित होते.