बुलढाणा दि. ६ (जिमाका) : माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या मातोश्री स्व.उर्मिला श्रीराम कुटे (वय 81) यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जामोद येथील निवासस्थानी भेट देत स्व. उर्मिला कुटे यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ.कुटे यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर,आमदार डॉ. संजय कुटे व त्यांचे कुटुंबिय, विभागीय उपायुक्त अजय लहाने, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकले, उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार, प्र.पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उप विभागीय अधिकारी शैलेश काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.