मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. देवगाव शनि ता. वैजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यावेळी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी, कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (तापी, विदर्भ, कोकण) गिरीश महाजन, आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठल लंघे, सुरेश चव्हाणके, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. वन नेशन वन प्रॉडक्ट या संकल्पनेंतर्गत जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठणी साडी या जिल्ह्याच्या उत्पादनाला चालना दिली आहे. त्यादृष्टीने पैठण येथील उत्पादन असलेल्या पैठणी साडीबाबत सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

००००००