मावळ तालुक्यातील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा द्या – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ७ : मावळ तालुक्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय वडगाव (कान्हे) व लोणावळा येथील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आरोग्यविषयक विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, तसेच आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वडगाव (कान्हे) येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, डायलिसिस केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी व पदनिर्मिती, ट्रामा केअर सेंटरसाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती, सिटी स्कॅन व एमआरआय सेवा सुरू करणे, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व सर्जिकल साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणे, तसेच स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे यांचा समावेश होता.

000

संजय ओरके/विसंअ