नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.
येवला शहरातील विविध रस्ता काँक्रीटीकरण
व सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला नगरपरीषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, विकास काम करतांना त्या कामाचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे. कामाच्या गुणवत्तेबरोबर लोकसहभाग ही महत्वाचा आहे. नागरिकांनी भौतिक सुविधांबरोबरच शिक्षण व आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे.
भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी महिलांनी मंत्री श्री. भुजबळ यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून सण साजरा केला.
या कामांचे झाले भूमिपूजन
1) श्री बालेश्वरी माता मंदिर ते समता पतसंस्था रस्ता कॉक्रीटीकरण व भूमिगत गटार बांधकाम करणे व कामाचे भूमीपूजन करणे. (रु.64.83 लक्ष)
2) गंगादरवाजा रोड हिंगलाज माता मंदिर येथे सभामंडप बांधणे व भूमीपूजन करणे (रु. 19 लक्ष)
3) येवला शहरातील गोरोबाकाका मंदिर सर्वे न. 25/4 ब येथे संरक्षण भिंत बांधणे. शेड बांधकाम व अनुषंगिक कामे करणे व भूमिपूजन करणे (रु. 34.35 लक्ष)
4) वेध कॉलनी भागात श्री. चव्हाण यांचे घर ते पुष्पा वाळुंज यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिपूजन करणे. (रु. 26.32 लक्ष)
00000