सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक स्थळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून अभिवादन केले. ही स्मारके लवकरच हस्तांतरीत व्हावीत आणि तेथील उर्वरित कामासाठी आवश्यक निधी देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी आमदार अरूण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शरद लाड, समित कदम आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथील कारखाना परिसरात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या समाधी स्थळी तसेच क्रांतीसिंह नाना पाटील स्मारक व क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक स्थळी भेट देऊन पाहणी केली.
00000