राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि.१०: राज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.




