शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

0
13

नागपूर शहर व ग्रामीण आरोग्य विभागाचा घेतला आढावा                 

नागपूर,  दि. 16 :  नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना विषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला.

आरोग्य यंत्रणेने सतर्क व सज्ज राहून कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत नागपूर शहरात 13478 रुग्ण असून त्यापैकी  3679  हे रुग्ण ग्रामीणचे आहेत. आतापर्यंत 6300 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण मृत्यू संख्या 461 असून 75 मृत्यू ग्रामीण तर शहरातील 326 मृत्यू व 60 हे बाहेर जिल्ह्यातील आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर 46.74% आहे. नागपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 12 डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु झालेले असून एकून 23 डेडीकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) निश्चित करण्यात आले आहे. एकूण आयसोलेशन बेड 3215, ऑक्सीजन सपोर्टेड 2370 व 724 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त 34 डी.सी.एच. निश्चित करण्यात आले आहेत. डीसीएच मध्ये एकुण 446 व्हेंटिलेटरर्स आहेत. तसेच एकूण 51 कोविड केयर सेंटर निश्चित करण्यात आलेले आहेत. एकूण बेड संख्या 14428 आहे. सद्यस्थितीत 12 कोविड केयर सेंटर ग्रामीण व 5 कोविड केयर सेंटर महानगरपालिका  क्षेत्रात कार्यरत आहेत. तपासणीकरिता 7 शासकीय व 6 खाजगी प्रयोगशाळा सुरु असून  आतापर्यंत 114184  तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यत 27045 अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या असून 1485 पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली.

मनुष्यबळाची उपलब्धता व त्यांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयात पदस्थापना  देण्याबाबात चर्चा झाली. मेडिकल आयसोलेशन  व तज्ज्ञ पुरवण्याबाबत चर्चा करावी, अशी मंत्री महोदय यांनी सूचना केली. या बैठकीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सेलोकर, डॉ.अविनाश गावंडे व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here