(दि.१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२० या कालावधितील शासनाचे निर्णय व महत्वाच्या घडामोडिंचा संक्षिप्त आढावा.)
कोरोना युद्ध
16 ऑगस्ट 2020
- आज ८८३७ रुग्ण बरे, आतापर्यंत ४ लाख १७ हजार १२३ बऱ्या झालेल्या रुग्णांची घरी रवानगी. रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के. ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू -२८८
- २२ मार्च ते १५ ऑगस्टपर्यंत कलम १८८ नुसार २, २९ ,३५२ गुन्ह्यांची नोंद, ३३,३६१ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी २० कोटी ९९ लाख ७८ हजार ८४४ रु. दंडाची आकारणी.
- राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण. सध्या 14 जिल्ह्यांमधून प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु, कोरोनाची परिस्थिती पाहून प्रत्यक्ष प्रशिक्षण, 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित. या भरतीमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना संधी मिळण्यासाठी प्रयत्न. प्रत्येक जिल्ह्यातून 100 उमेदवारांची निवड, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्यास ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी 1 हजार रुपये, पुस्तक खरेदीसाठी 300 रुपये, प्रतिमहिना 1 हजार 500 रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी 3 हजार रुपये विद्यावेतन, प्रशिक्षण कालावधीत दररोज अल्पोपहार, प्रत्येक जिल्ह्यासाठी 5 लाख 60 हजार रुपये खर्चाची तरतूद.
१७ ऑगस्ट २०२०
- आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक, ११ हजार ३९१ रुग्ण बरे, ८४९३ नवीन रुग्णांचे निदान, आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के, सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर उपचार सुरू, कालच्यापेक्षा आज ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी. नोंद झालेले मृत्यू २२८.
- अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता १५ शासकीयतंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध , दुसऱ्या पाळीतील वर्गांमध्ये 1 हजार 920 जागा मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, या विषयांमध्ये उपलब्ध. संपर्क- http://www.dtemaharashtra.gov.in, पॉलिटेक्निक संस्थेचा पत्ता, संस्था प्रमुख, प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहितीसाठी संपर्क- http://mdd.maharashtra.gov.in
- सायबर संदर्भात ६०१ गुन्हे दाखल, २९० व्यक्तींना अटक,आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी – २१९ गुन्हे दाखल, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी – २६२ गुन्हे दाखल, टिकटॉक व्हीडिओ विडिओ शेअर प्रकरणी – २८ गुन्हे दाखल, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी – १९ गुन्हे दाखल, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल, अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब Tube ) गैरवापर केल्या प्रकरणी ६८ गुन्हे दाखल, आतापर्यंत २९९ आरोपींना अटक, १३६ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश. करण्यात यश.
- २२ मार्च ते १६ ऑगस्टपर्यंत २, २९ ,६४५ गुन्ह्यांची नोंद, ३३,४६८ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी २१ कोटी ४ लाख २४ हजार ४४ रु. दंडाची आकारणी,अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ५५ हजार ६४५ पासेसचे वितरण,पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३३३ घटना, त्यात ८८८ व्यक्तींना ताब्यात, हेल्पलाइन १०० क्रमांकावर १,१०,४१७ दूरध्वनी. हातावर क्वारंटाइन शिक्का असलेल्या ८२७ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल. ९५,८२१ वाहने जप्त.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात १२६ पोलिसांचा मृत्यू. सध्या कोरोना बाधीत २८९ अधिकारी व २०४३ पोलीसांवर उपचार सुरू.
१८ ऑगस्ट २०२०
- आज ९३५६ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के, आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे. ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरू, नोंद झालेले मृत्यू – ४२२.
- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत चर्चा, महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसेच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा याबाबत बैठकित विचारविनिमय, या शिफारशींवर कृती करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित. ठळक मुद्दे- कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थतज्ञ, संशोधक यांच्या शिफारशींमुळे राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत, विकास करताना स्थानिकांशी संवाद साधणे आवश्यक, प्रकल्प आणताना स्थानिक नागरिकांच्या मतांना प्राधान्य,’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत २४ टाऊनशिप्सची उभारणी, या महामार्गालगत उद्योगांचे भक्कम जाळे उभारणार, पर्यावरणाच्या अटी नसलेले उद्योग लगेच सुरु करता येतील अशा व्यवस्थेची निर्मिती. झोपडपट्टी पुनर्विकासच्या माध्यमातून गृहनिर्माणाला वेग, बांधकाम क्षेत्राला उर्जा देण्यासाठी स्ट्रेस फंड.
- कोरोना बाधितांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर याजिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन. यामुळे संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य. कोरोनामुळे होणाऱ्या राज्याचा मृत्यू दर ३.३५ टक्के मात्र मुंबई, नंदूरबार, सोलापूर, अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी या जिल्ह्यांचा मृत्यूदर राज्य सरासरीपेक्षा अधिक असल्याने या जिल्ह्यांना मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश. विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन जिल्ह्यांना विशेषज्ञ घेण्याचे अधिकार, त्यांना तीन महिन्यांची ऑर्डर आणि २ लाख रुपये प्रति महिना अदा, आरोग्य विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी वर्ग क आणि ड च्या याद्या मेरीटनुसार करण्याचे काम सुरू. कोरोना काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना ५० लाख रुपयांचे विमा छत्र लागू.
- २२ मार्च ते १७ ऑगस्टपर्यंत २,३०,२०६ गुन्ह्यांची नोंद, ३३,५०७ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी २१ कोटी १६ लाख ९९ हजार ४०४ रु. दंडाची आकारणी. अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ५६ हजार ९३९ पासेसचे वितरण.
- मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गणेशोत्सव, कोरोना उपाययोजना याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा. यावेळी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, गृहमंत्री श्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे उपस्थित. महत्वाचे निर्देश- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेने साजरा करा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्या, मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरीच करा, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करा, तेथे गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करा, मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढवा. चाचण्यांचे प्रमाण वाढवा, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्या, चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करा.
१९ ऑगस्ट २०२०
- आज ९०११ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के , आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे, १३ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरू.नोंद झालेले मृत्यू ३४६.
- चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांमध्ये काम करणाऱ्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
- कोरोनाची स्थिती पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाइन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश. रत्नागिरी आणि लातूर येथे लवकरच प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांची स्थापना, या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी समिती गठीत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ महिने बंद असलेली एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत बंद असलेली सेवा २० ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्याचा निर्णय. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही.
- २२ मार्च ते १८ ऑगस्ट पर्यंत २,३०,९३६ गुन्ह्यांची नोंद, ३३,५५३ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी २१ कोटी ३६ लाख ९ हजार ४५४ रु. दंड. अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ६३ हजार २६७ पासेसचे वितरण.
- पंजाब नॅशनल बँक कर्मचारी व बँकेच्या सहयोगाने आज ६४ लाख रुपयांचा कोविडसंदर्भातील धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.
20 ऑगस्ट २०२०
- आज १२,२४३ रुग्ण बरे, आतापर्यंत बऱ्या झालेल्या ४,५९,१२४ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ %. आज १४,४९२ नवीन रुग्णांचे निदान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,१४,८०९ नमुन्यांपैकी ६,४३,२८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह. सध्या राज्यात ११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाइन ३७,६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन, आज एकूण १,६२,४९१ ॲक्टिव्ह रुग्ण, आज १४,४९२ नवीन रुग्णांची नोंद, करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६,४३,२८९, नोंद झालेले मृत्यू- ३२६, मृत्यूदर ३.३२ %.
- यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी सुरु असलेल्या औद्योगिकप्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
- मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बैठक. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण मंत्री श्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री श्री बच्चू कडू उपस्थित. महत्वाचे निर्देश- नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण तज्ञांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करा. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात शिक्षण विभागाने ऑनलाइन आणि ऑफलाइन शैक्षणिक उणिवा आणि अडथळे दूर करा, सध्याचा काळात जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करा. २१ ऑगस्ट २०२०
- आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के, आतापर्यंत बरे झालेल्या ४ लाख ७० हजार ८७३ रुग्णांची घरी रवानगी, आज १४ हजार १६१ नवीन रुग्णांचे निदान, १ लाख ५६४ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू, नोंद झालेले मृत्यू- ३३९.
- कापूस पणन महासंघाच्या अडचणी संदर्भात पणन मंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार असल्याचे श्री पाटील यांचे आश्वासन.
- गणेशोत्सवासाठी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना- १) सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक.२) कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन न्यायालयाचे आदेश आणि महापालिका व स्थानिक प्रशासन यांच्या धोरणाशी सुसंगत मंडप उभारण्यात यावेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना भपकेबाजी नसावी.३) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळ- ४ फूट व घरगुती गणपती २ फुट. ४) पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरी करावे. तसे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यातील विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य. ५) उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही,याची दक्षता घेणे आवश्यक. आरोग्य व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे, कोरोना, मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.७) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियम व तरतुदींचे पालन आवश्यक.८) श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन,केबल नेटवर्क, संकेतस्थळ फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.९) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम, मास्कचे परिधान याकडे लक्ष देण्यात यावे. १०) श्री चे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे. चाळीतील अथवा इमारतीतील घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये. ११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
- मोहरमच्या दुखवट्याच्या अनुषंगाने मातम मिरवणूक, वाझ/ मजलीस, ताजिया/आलम,सबील/छबील संदर्भात मार्गदर्शक सूचना . १) मातम मिरवणूक- घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी नाही. खाजगी मातम घरीच करणे आवश्यक. सोसायटीमधील नागरिकांनी एकत्रीत मातम /दुखवटा करू नये. २) वाझ/मजलीस- शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने आयोजित करावेत. ३) ताजिया/आलम – काढण्यास परवानगी नाही. ४) सबील/छबील- बांधण्या संदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक. त्या ठिकाणी दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप आणि स्वच्छता आवश्यक , सोशल डिस्टंसिंगचे पालन आवश्यक. कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. ५) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर रक्तदान, आरोग्य, प्लाज्मा शिबिरे असे उपक्रम राबवून स्वच्छते विषयक जनजागृती करावी.
- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक. निर्देश- पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, ‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घ्या.
- मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा आणि डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन. यावेळी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार,महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री श्री राजेश टोपे, उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित. कोरोनाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच सध्याचे औषध असल्याचे श्री ठाकरे यांचे प्रतिपादन. जिल्हा यंत्रणेने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहन. सुविधा- या आरटीपीसीआर लॅबमुळे कमीत कमी वेळेत कोरोना चाचणी अहवाल मिळणे शक्य. दिवसाला किमान 94 तर कमाल 376 करून चाचण्या करणे शक्य. राज्यात सध्या 285 शासकीय तर 84 हजार 369 खाजगी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा कार्यरत असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार नूतनीकरण कामाचे व कार्डियाक अँब्युलन्सचे ऑनलाईन उद्घाटन. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित. या अँब्युलन्समध्ये व्हेंटीलेटर, डिफायब्रीलेटर, ऑक्सीजन मशीन, मॉनिटर्स आदी कोरोनाविरोधात लढण्यासाठी सुसज्ज यंत्र सामुग्रीची सुविधा.
२२ ऑगस्ट २०२०
- आज ९ हजार २४१ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के, आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे, आज १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु, नोंद झालेले मृत्यू- २९७
- केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलीटीद्वारे उपलब्ध, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोराम, ओरीसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, दादरा-नगर हवेली व दिव-दमण, जम्मु कश्मिर, मणिपूर, नागालॅन्ड, उत्तराखंड येथील शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध. मुंबई / ठाणे शिधावाटप यंत्रणेसह राज्यातील व उपरोक्त नमूद परराज्यातील पात्र शिधापत्रिकाधारक त्यांना देय असलेले अन्नधान्य अधिकृत शिधावाटप दुकानातून शिधापत्रिकेवर पोर्टबिलीटीद्वारे प्राप्त करुन घेण्याची सुविधा. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दरमहा (प्रति व्यक्ती 2 रुपये प्रति किलो दराने गहू, 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ) – 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ. प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय अन्न योजना- (प्रतिशिधापत्रिका 2 रुपये प्रति किलो दराने गहू व 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ)- 35 किलो धान्य. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ – एकूण 5 किलो मोफत अन्नधान्य, प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो तूरडाळ किंवा चणाडाळ मोफत.
इतर निर्णय व घडामोडी
16 ऑगस्ट 2020
- पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत जनतेला शुभेच्छा.
- ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीम यांच्या उपस्थितीत उमेद अभियानातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिला व समुदाय संसाधन व्यक्तींसाठी ऑनलाइन महिला उद्बोधन मेळावा संपन्न. यावेळी राज्यमंत्री श्री. अब्दुल सतार, उपस्थित. उमेद अभियानातील बचतगटांच्या महिलांचे साहित्य व उत्पादनास ॲमेझॉनव्दारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यात यश. ऑनलाइन मेळाव्यात एक लाख महिलांचा सहभाग.१५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात मासिक पाळीविषयक जनजागृतीसाठी ‘जागर अस्मिता’ मोहिमेची अंमलबजावणी,
- अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
- आर. आर. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत श्रध्दांजली.
१८ ऑगस्ट २०२०
- स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची आदरांजली.
- माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत दुःख व्यक्त.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांना पोळा सणाच्या शुभेच्छा.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- राज्यात २० ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्यात येत असल्याची अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
- मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याहस्ते 4 लाखांच्या धनादेशांचे वितरण.
- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्य सचिव श्री संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक. महासंघाचे सल्लागार श्री ग.दी कुलथे,अध्यक्ष श्री विनोद देसाई उपस्थित. राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, वेतन त्रुटी संदर्भातील बक्षी समितीचा खंड दोन सादर करणे, चक्राकार पद्धतीच्या बदल्यांमधून महिलांना वगळणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची मर्यादा काढणे आदी मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे मुख्य सचिवांचे आश्वासन.
- रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मुरुड, अगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीचा प्रस्ताव करण्याचे निर्देश.
- एसटी महामंडळामार्फत पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी एसटी महामंडळ व इंडियन ऑइल यांच्यात सामंजस्य करार झाल्याची परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती.
- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भोर विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न, नवीन उपकेंद्र व वीज यंत्रणेचे सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बैठक. या भागातील विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच दुर्गम, अतिदुर्गम भागासह इतर ठिकाणच्या वीज वितरण यंत्रणेचा आणखी विस्तार करण्याची डॉ.राऊत यांची ग्वाही.
- वांद्रे येथे रिकाम्या इमारतीचा कोसळलेल्या दुर्घटनाग्रस्त भागाची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्याव्दारे पाहणी व मदतकार्याचा आढावा.
- औष्णिक वीज निर्मिती केंद्राद्वारे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्यासमवेत बैठक. औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकाम आणि सिमेंट कारखान्यात करण्याच्या दृष्टीने धोरण तयार करण्याचे डॉ. राऊत यांचे उर्जा विभागाला निर्देश.
१९ ऑगस्ट २०२०
- सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
- राज्याच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने नवीन उर्जा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च स्तरीय समितीच्या कामकाजाचा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्यामार्फत आढावा.वीज गळती थांबवणे, खर्चात कपात, १०० युनिट पर्यंत घरगुती ग्राहकांना मोफत वीज, वीज वहन व निर्मिती या खर्चात कमी करणे यावर चर्चा.
- चंदन वृक्षतोड, वाहतूक व विपणनाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कायदो व नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची वनमंत्री श्री संजय राठोड यांची घोषणा.
- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याचे आवाहन, आधारकार्ड लिंक करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२०.
20 ऑगस्ट २०२०
- नागरी स्वछता अभियानात १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ आणि इतर १३ अशा एकूण १७ पुरस्कारांनी महाराष्ट्र सन्मानित. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक. देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांक पुरस्कार- नवी मुंबई, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या स्वच्छ शहर श्रेणी प्रथम पुरस्कार- कराड, द्वितीय- सासवड तृतीय- लोणावळा. पश्चिम विभाग २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या श्रेणी- पन्हाळा , शाश्वत स्वच्छता – जेजुरी, स्वच्छतेची नाविन्यपूर्ण कामे- अकोले. २५ ते ५० हजार लोकसंख्या श्रेणी- शिर्डी, स्वच्छतेचे नाविन्यपूर्ण काम- विटा ,शाश्वत स्वच्छता – इंदापूर, ५० हजार ते एक लाख लोकसंख्या श्रेणी- शाश्वत स्वच्छ शहर – बल्लारपूर, नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद- हिंगोली, गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव आणि रत्नागिरीचा सन्मान. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीचा पुरस्कार. अमृत स्वच्छ श्रेणीमध्ये देशातील १०० शहरांपैकी राज्यातील ३१ शहरांचा समावेश. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये, २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त, २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस.
- उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती.
- २०१४ व २०१६ सालातील महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या ५४२ पैकी ५५ जणांनी महामंडळाकडे नेमणूक मिळावी यासाठी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती.
- पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास शासन कटिबद्ध असल्याने तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नसल्याचे श्री ठाकरे यांचे प्रतिपादन.
- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकराज्यच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे विमोचन. यावेळी उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे,मुख्य , मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित.
- माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत अभिवादन.
- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याव्दारे अभिवादन, ‘सद्भावना’ दिनानिमित्त मंत्रालयात प्रतिज्ञेचे वाचन. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम उपस्थित.
- सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत आदरांजली .
२१ ऑगस्ट २०२०
- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘गणेशोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा’.
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त निधीतून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रलंबित कामांचा आढावा याबाबत बैठक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांनी या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे श्री सामंत यांचे निर्देश.
- पुणे शासकीय तंत्रनिकेतनच्या अधिव्याख्यातांच्या अडचणींबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
- औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अडचणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. राज्य शासन आणि विद्यापीठे यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी नोडल अधिकारी नेमण्याचे श्री सावंत यांचे निर्देश. महत्वाचे मुद्दे- जालना येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक, घनसांगवी येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या अडचणी आणि निधी संदर्भात मुख्य सचिवांशी चर्चा, वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त भटक्या व विमुक्त जाती – जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्मिती, दीन दयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रास मुदतवाढ, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे स्थैर्य, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहासाठी पदनिर्मिती, २०१८-१९ च्या खरीप हंगामातील दुष्काळ सदृष्य तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, संतपीठाचा प्रारंभ.
- कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांनी गणेशोत्सव तसेच मोहरम साधेपणाने करण्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचे आवाहन
- सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती.
- राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन.
- पु. ल. देशपांडे कला अकादमी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करुन राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न करण्याचे, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश.
- संगमनेर तालुक्यातील मंगळापूर या छोट्या गावातून आलेल्या दत्तू भोकनळ यांनी प्रतिकूल परिस्थितीतून तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत मिळवलेला यंदाचा अर्जुन पुरस्कार, संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान असल्याची महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया.
- महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा.
०००