मुख्यमंत्री जनगौरव सोहळ्याचे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी प्रसारण

0
11

मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री जनगौरव समिती, ठाणे यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम “मुख्यमंत्री जनगौरव सोहळा” मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दि. 26 रोजी रात्री 8:30 वा. प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ठाणे शहरातून निघालेली स्वागत यात्रा, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेला सत्कार व गौरव समारंभ, नामवंत कलावंतांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखतीची झलक रसिकांना पहायला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री जनगौरव समिती, ठाणेचे समन्वयक जयु भाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here