‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची उद्या मुलाखत

0
7

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. 25ऑगस्ट 2022 रोजी  सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

समता हा कोणत्याही समाजाच्या विकासाचा पाया असतो. समता विचारपीठ सुरू ठेवून विकासाला चालना देणे हाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा उद्देश आहे. संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन तरूणपिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य बार्टी ही संस्था करते. या  संस्थेचे कार्य, त्याचा उद्देश आणि त्याची सद्य:स्थिती याविषयी सविस्तर माहिती धम्मज्योती गजभिये यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here