मिरज शहरातील मुख्य रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : मिरज महत्वाचे शहर असून दररोज हजारो लोक या शहरात ये-जा करीत असतात. या शहरातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी दर्जेदार करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या मुख्‍य रस्त्याचे काम सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून तातडीने पूर्ण करावेअसे आदेश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

मिरज येथील शासकीय विश्रामगृहात मिरज शहरातील मुख्य रस्त्याच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटीलमहापालिका आयुक्त सुनिल पवारप्रांताधिकारी समीर शिंगटेएमएसईबीचे मुख्य अभियंता श्री. पेठकरउपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकरतहसिलदार दगडू कुंभार, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, शहर अभियंता संजय देसाई, प्रभारी अतिरीक्त आयुक्त संजू आहोळ, नगररचनाकार राजेंद्र काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मिरज मधील मुख्य रस्ता तातडीने पूर्ण करणे यासाठी सर्वच विभागांनी प्राधान्य देवून काम करावे. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असतील त्या ठिकाणची अतिक्रमणे कायदेशीर बाबी तपासून तातडीने काढण्यात यावीतअसे आदेशीत करून कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणालेरस्त्याच्या कामामध्ये अडथळा करणारी झाडे तातडीने काढण्याबाबत कार्यवाही करावी. रस्ता करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कालबध्द कार्यक्रमाची आखणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कंत्राटदारांची नेमणूक करावी. त्याचबरोबर कंत्राटदारानीही ही कामे करताना दर्जा चांगल्या पध्दतीचा ठेवून गतीने कामे करावीत. विद्युत विभागाने इलेक्ट्रीक पोल सिफ्टींग तातडीने करण्याबाबत प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ यंत्रणांकडून मंजूर करून घ्यावा व इलेक्ट्रीक पोलचेडीपीचे तातडीने सिफ्टींग करावे. त्याचबरोबर तानंग फाटा ते गांधी चौकापर्यंतचे रस्त्याचे काम कंत्राटदाराने तातडीने सुरू करावे. ही कामे करताना या कामात सक्रीय असलेल्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने कामे करून हा रस्ता युध्द पातळीवर पूर्ण करावाअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार संजय पाटील यांनी सदरच्या रस्त्याचे काम हे तातडीने पूर्ण होण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेवून योग्य पध्दतीने काम करावेअसे निर्देशित केले. ज्या ठिकाणी अतिक्रमणे असतील तेथील कायदेशीर बाबींचा प्राथम्याने सर्व्हे करून कामकाजाची दिशा ठरवावी. तसेच हा रस्ता तातडीने पूर्ण होण्यासाठी यंत्रणांनी मिशनमोडवर काम करावेअसे सांगितले.

 

00000