राज्यपालांनी केले विजय दर्डा यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि. 30 : लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांसह तीन कलाकारांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जहांगीर कलादालन मुंबई येथे झाले.

‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, स्वामी नित्यानंद, अभिनेते जॅकी श्रॉफ, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, तसेच प्रदर्शनातील सहभागी कलाकार रचना दर्डा, जयश्री भल्ला व बीना उपस्थित होते.

या प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराची एक कलाकृती आपण राजभवनासाठी खरेदी करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले.

००००

 Governor Koshyari inaugurates Painting Exhibition by Vijay Darda

Mumbai, 30th Aug : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated ‘Four Stories’ , an Exhibition of paintings of Chairman of Lokmat Media and former MP Vijay Darda and three other artists at Jehangir Art Gallery in Mumbai.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar, MP Praful Patel, Swami Nityanand, DGP Rajnish Seth, filmstar Jackie Shroff and participating artists Rachana Darda, Jayashree Bhalla and Bina were present. The Governor announced the purchase of 4 paintings of all the participating artists on the occasion.

0000