‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची मुलाखत

0
8

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून मंगळवार,  १३  सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत जनावरांमध्ये आलेल्या लम्पी साथ आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना,   घ्यावयाची काळजी, साथ आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शेतकरी वर्गाने पशुधनाच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी  याबाबतची सविस्तर माहिती, श्री. सिंह यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here