मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १७:- ‘आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकिक असलेले प्रगल्भ असे मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘ज्येष्ठ नेते गावित यांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री ही वाटचाल त्यांच्या नेतृत्वाविषयी खूप काही सांगून जाते. त्यांनी निवडणुकीतील मताधिक्याने आपल्या लोकप्रियतेची ओळख करून दिली. आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्यासाठीच्या विकास प्रकल्प, योजना यासाठी ते हिरीरीने प्रयत्नशील असत. त्यांच्या सारखे मार्गदर्शक नेतृत्व गमावणे हे राजकीय क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना भावपूर्ण श्रद्धांजली’

00000