सचिवालय जिमखाना वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी

मुंबई, दि. 20 : सचिवालय जिमखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 28 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता सचिवालय जिमखाना, मुंबई येथे होणार असल्याचे सचिवालय जिमखाना व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबतची सूचना अहवालासह सचिवालय जिमखान्याच्या  www.sachivalayagymkhana.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदानासाठी जिमखान्याचे सभासद/निवृत्त सभासद यांचेकडे जिमखाना / कार्यालय/ पॅन कार्ड अथवा आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.