‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

0
11

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार  दि. 23 सप्टेंबर आणि शनिवार दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक भक्कम करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान, आरोग्य विभागाची नोकर भरती याबाबत विस्तृत माहिती आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत  यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान संपूर्ण राज्यात सुरु होणार आहे. या अभियानाचा सर्व माता, भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here