नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी आणि संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

0
13

मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2020-21 व 2021-22 या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सन 2020 – 21 साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे.

सन 2020 – 21 साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/22.9.22  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here