मुंबई, दि.2 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उद्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शनिवारी, 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह, फोर्ट, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी केले आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ