चर्चासत्रात कर्करोग उपचाराविषयी सखोल मार्गदर्शन

नागपूर,  दि.  6 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी ‘कर्करोग उपचार’ या विषयावर ‘केमो प्रतिबंधक आहारातील आणि वनस्पती वापरून कर्करोगाचा प्रतिबंध’ याविषयावर चर्चासत्र पार पडले. त्यात कर्करोग उपचारांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रा.अशोक कुमार, कुलगुरू, निर्वाण विद्यापीठ, जयपूर यांनी “भारतातील वनस्पतींमधून संभाव्य कर्करोगविरोधी औषधांच्या ओळखीसाठी बायोप्रोस्पेक्टिंग” द्वारे सादरीकरण केले. त्यांनी या पद्धतीविषयी सांगितले की, याचा उद्देश कर्करोगजन्य रोगाचा आरंभ टप्पा किंवा निओप्लास्टिक विभाजनाची प्रगती रोखणे, अटकाव करणे हा आहे. भारतात आढळणाऱ्या विविध वनस्पतींच्या अर्कांमधून नवीन संभाव्य कर्करोगविरोधी औषध उमेदवारांच्या शोधात गुंतलेल्या गटाबद्दल त्यांनी तपशीलवार माहिती दिली.

डॉ. राणा पी. सिंग, कॅन्सर बायोलॉजी लॅबोरेटरी स्कूल ऑफ लाइफ सायन्स आणि अँप; सेंटर फॉर सिस्टम मेडिसिन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यांनी ‘कर्करोगात उपचारात्मक प्रतिरोधक विकासात डीएनए दुरुस्तीची भूमिका’ या विषयावर चर्चा केली.  तर डॉ. धनलक्ष्मी शिवनंदन यांनी ‘कर्करोगाच्या उपचारासाठी नॉव्हेल ड्युअल इनिहिटर’ वर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर डॉ. रुबी जॉन अँटो यांनी ‘ए रिसेप्टर -ब्रेस्ट कॅन्सर उपचारासाठी स्वतंत्र कॉम्बिनेटोरियल थेरप्युटिक रेजिमन या विषयावरही चर्चा केली.

000000