लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

0
6

दावोस दि. १७ : लक्झमबर्गचे पंतप्रधान झेव्ह‍िएर बेटेल  (Xavier Bettle)  आणि राजपुत्र गुलिएम जेन जोसेफ ( Guillaume Jean Joseph)  यांनी आज महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्यात चर्चाही झाली.

महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे छायाचित्र व प्रदर्शन सुरु आहे, तेही त्यांनी आवर्जून पाहिले आणि झपाट्याने बदलत्या मुंबईविषयीची माहिती जाणून घेतली.

सिंगापूरचे मंत्री डेस्मंड ली यांची महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट

सिंगापूरचे मिनिस्टर ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट डेस्मंड ली यांनी आज महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती त्यांना दिली.  यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची इंडिया पॅव्हेलियनला भेट

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज संध्याकाळी दावोस येथील इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन चर्चा केली.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here