‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची उद्या मुलाखत

0
8

मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. १९ जानेवारी २०२३ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचऱ्याचे नियमित संकलन, सुशोभिकरण यावर भर देत आपल्या कामात सातत्य राखत कराड नगरपालिकेन हे यश मिळवले आहे. कराड नगरपालिकेच्या या प्रेरणादायी कार्याची माहिती कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून जय महाराष्ट्र कार्यक्रमात जाणून घेतली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here