‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बुधवार व गुरुवारी मुलाखत

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 25, गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

राष्ट्रीय मतदार दिन देशभरात दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम कोणते आहेत, राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा उद्देश, मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबतची  सविस्तर माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000