शिवजन्मोत्सवनिमित्त पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप

0
11

उस्मानाबाद,दि.19(जिमाका): महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते साजा रोड येथे भवानी चौकात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले व उपस्थित शेतकरी आणि नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी सामुहिक आरती करण्यात आली या आरतीमध्ये परीसरातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here