संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 23 : संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून गाडगेबाबा यांना अभिवादन केले.

000

धोंडिराम अर्जुन/स.सं.