बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी माविमचे ‘टिसर’ सोबत सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
5

मुंबई, दि. 3 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून  कौशल्यपूर्ण विविध वस्तूंची निर्मिती करण्यात येते. आज सुरू होणाऱ्या विक्री केंद्राच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. माविम ने ‘टिसर’ सोबत केलेली भागीदारी या विक्री केद्रांसाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

अंधेरी पश्चिम, सावली वसतीगृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला उत्पादन विक्री केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधानसचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवालमाविमच्या व्यवस्थापकीय संचालक इंदुराणी जाखर, ॲक्सीस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीसटिसर् संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲक्सीस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस म्हणाल्या, मुंबईत अंधेरी सारख्या ठिकाणी महिला बचत गटाच्या मालाला विक्रीसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र उभारल्याबद्दल तसेच जागतिक महिला दिनाच्या अगोदर उद्घाटन केल्याबद्दल खूप आनंद होत आहे. आज रोजी महिलांना बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की महिला कर्ज परतफेड वेळेत आणि पूर्ण करतील. बॅंकाकडून मिळालेल्या  ६३००/- कोटी कर्जाची परतफेड   ९९ टक्के होत आहे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी महाराष्ट्रातील काही निवडक कारागिर महिला चंद्रपूर मधील बांबू कामकारपेट युनिटगोंदियातील लाख युनिटठाण्यातील वारली आर्ट व मुंबईतील टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणा-या महिलांभंडारा जिल्ह्यातील काथ्या काम  करणा-या कारागीर महिलांचा सत्कार करण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. महाव्यवस्थापक कुसम बाळसराफ यांनी आभार मानले.                                          

*****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here