प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध

मुंबई, दि. 6 : सर्वसामान्यांना माफक व स्वस्त दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. गरजूंनी माफक दरात औषध खरेदी करण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 9 हजार औषध दुकाने सुरु करण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये सर्व औषधे 50 ते 90 टक्के इतक्या स्वस्त दरात उपलब्ध आहेत. WHO-GMP प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या उत्पादकांकडून ही औषधे तयार करुन घेण्यात येतात. सन 2014 मध्ये संपूर्ण भारतात 80 जन औषधे केंद्र होती. डिसेंबर 2023 पर्यंत 10 हजारचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे.

०००००

अर्चना शंभरकर/विसंअ