‘दिलखुलास’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ८ व ९ मार्च रोजी मुलाखत

0
11

मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर बुधवार दि. 8 व गुरुवार दि. ९ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने महिला धोरण अधिक सर्वसमावेशक होण्यासाठी घेतलेला पुढाकार, शासनाच्यावतीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा पाठपुरावा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना कसे संरक्षण देता येईल, यासाठी त्यांचे सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत.

समाजात घडत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याशी मुक्त संवाद करणे, समाजाने संयम व समजूतीची भूमिका घेणे, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठीच्या विविध योजना अशा विविध विषयांवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सविस्तर संवाद साधला आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

सागरकुमार कांबळे/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here