मुंबई, दि. 10 : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील पावनगड निवासस्थान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सर्वश्री आमदार अनिल बाबर, प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, ज्ञानराज चौगुले यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
धोंडिराम अर्जुन/ससं/