‘नाटू नाटू’ गीत व द ‘एलिफंट व्हिस्परर’ माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव

0
4

मुंबई, दि. १५ : ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीतास तसेच ‘एलिफंट व्हिस्परर’ या माहितीपटास पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभागृहातील सदस्यांनी या ठरावाचे समर्थन केले.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ‘नाटू नाटू’ या गीताचे गीतकार चंद्रा बोस असून एम. एम. किरवाणी यांनी संगीत दिले आहे. श्री. राहुल सिपलीगंज व श्री. कालभैरव यांनी गायले आहे. या गाण्याची आवृत्ती दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी टी-सिरिजद्वारे प्रदर्शित झाली होती. लॉसएंजेलिस, अमेरिका येथे ऑस्कर हा पुरस्कार १२ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

याच सोबत द एलिफंट व्हिस्परर या लघु माहितीपटाबाबत माहिती देताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, या डॉक्युमेंटरीची निर्मिती अचित जैन यांनी केली आहे. कार्तिकी गोन्सालवीस  व गुनीत मोंगा यांनी दिग्दर्शन केले आहे. तामिळनाडूच्या मुदुमिलिया टायगर रिझर्व्ह मधील हत्तींच्या निरीक्षणातील ही जन्मकथा आहे. महिला दिग्दर्शिका कार्तिकी गोन्सालवीस यांनी भारतमातेस हा पुरस्कार अर्पण केला आहे.

000

बी.सी.झंवर/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here