सलीम दुर्रानी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 : भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, आज क्रिकेट विश्वात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, हे स्थान प्राप्त करण्यात ज्या क्रिकेटपटूंचे योगदान लाभले, त्यात सलीम दुर्रानी यांचे नाव अग्रस्थानी आहे. प्रेक्षक षटकाराची मागणी करत आणि ते चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून देत. त्यांच्या निधनाने क्रिकेट क्षेत्राचा एक मोठा मार्गदर्शक हरपला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, हीच प्रार्थना.