बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

0
3

मुंबई, दि. ३ : बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिल २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास या जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे, असे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी काढले आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here