मुंबई, दि. ३ : ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील शहापूर, डहाणू, पालघरमधील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. मोबाईल नेटवर्क नसल्याने स्थानिकांना मदतीसाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहापूर परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर उद्भवलेल्या समस्यांबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच हॅम रेडिओ, वॉकी-टॉकी सारखी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार तयारी करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
०००