अकोला,दि.10 (जिमाका)- अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी आज अकोला तालुक्यातील माझोड येथे प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्वस्त केले. त्यांचे समवेत आमदार वसंत खंडेलवाल, रणधीर सावरकर, हरिष पिंपळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
श्री. महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चौकशी केली. तातडीने पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आश्वस्त केले.
00000