‘दिलखुलास’ कार्यक्रमात १२ आणि १३ एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘उष्माघात : खबरदारी आणि उपाययोजना’ या विषयावर सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 12 एप्रिल आणि गुरुवार दि. 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

जागतिक हवामान बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सर्वांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील नव्याने निर्माण झालेली आपत्ती म्हणजे उष्ण लहरींचे वाढते प्रमाण होय. त्या अनुषंगाने उष्माघात म्हणजे काय, यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी तसेच उष्माघात झाल्यास कोणते उपचार घ्यावेत अशा महत्त्वपूर्ण विषयावर डॉ. विनायक सावर्डेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.