राज्यस्तर शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा २०२२-२३ संपन्न

0
9

सातारा दि. 18 : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने राज्यस्तर शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन दि. 16  ते 18 एप्रिल 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे  करण्यात आले. या स्पर्धांचा शुभारंभ शिवछत्रपती पुरस्कार्थी भाग्यश्री फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले.

            या स्पर्धेत मुलांच्या गटात श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य.विद्यालय धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याने प्रथम क्रमांक, सरस्वती  विद्यालय इचलकरंजी द्वितीय तर तृतीय क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 55 यांनी प्राप्त केला.  मुलींच्या गटामध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर, विटा प्रथम क्रमांक, श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य. विद्यालय धाराशिव (उस्मानाबाद) द्वितीय तर गन्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल नाशिक तृतीय क्रमांक संपादन केला. स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषकाचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, मुक्ता भिंगारे, माधवी भोसले, सह सचिव महाराष्ट्र राज्य खो-खो डॉ. प्रशांत इनामदार,  सचिव सातारा जिल्हा खो-खो महेंद्रकुंमार गाढवे, प्रविण बागल, मंदार कोळी, शरद वनखेडे, रामजी कश्यप, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here