मुंबई, दि. १८ : भारतीय पत्र परिषदेच्या (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) अध्यक्ष न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. या समितीने माध्यम स्वातंत्र्य आणि पत्रकारिता मूल्यांच्या उल्लंघनासंबंधी ३६ प्रकरणांची सुनावणी घेतली. १४ प्रकरणांमध्ये समितीने शिफारशी केल्या असून उर्वरित प्रकरणे राखून ठेवली आहेत, अशी माहिती भारतीय पत्र परिषदेने दिली आहे.
००००