अकोला दि.१(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण, शानदार संचलन आणि विविध कर्तृत्ववानांचा झालेला सन्मान यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.
लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व लगेचच ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर सादर करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संगिताताई अढाऊ, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सभापती श्रीमती आम्रपाली खंडारे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे, जिल्हा कामगार अधिकारी डॉ. राजू गुल्हाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक परिवारातील सदस्य, शहिदांचे वारसदार, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.
शानदार संचलन
ध्वजारोहण व राष्ट्रध्वज मानवंदनेनंतर पोलीस दलाने संचलन केले. या संचलनात पोलीस दल, गृहरक्षक दल , महिला पोलीस दल, अग्निशमन, १०८ रुग्ण वाहिका,श्वान पथक, बिनतारी संदेश विभाग आदींनी पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर संचलन केले. जोशपूर्ण संचलनाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
सामाजिक न्याय विभागाच्या ‘यशोगाथा’ पुस्तिकेचे प्रकाशन
सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेत उत्कृष्ट कार्य;वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी सन्मानीत
जागतिक आरोग्य दिन दि.७ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ‘सुंदर माझा दवाखाना’, हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात आला. त्यातील उत्कृष्ट तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र यांची निवड करण्यात आली. डॉ. मनिष वाघमारे, कापशी ता. अकोला प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. आरीफ खान, पोपटखेड ता. अकोट प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. विनोद जेठवानी, कुरुम ता.मुर्तिजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र. तर आरोग्य उपकेंद्र स्तरावरील डॉ. रश्मी राजेंद्र सराळे, श्रीमती सलोनी अशोक पोटे गोरेगाव ता. अकोला आरोग्य उपकेंद्र, डॉ. गफारिया खातून, श्रीमती सुचित्रा बांबल, श्री. नागरा पटले बोर्टा ता. मुर्तिजापूर, डॉ. शिवानी लादे, श्रीमती रुपाली चारथळ, वैजनाथ मिसाळ, हिवरा कोरडे ता. मुर्तिजापूर, डॉ. आमिर सोहेल, श्रीमती माधुरी इचे, प्रवीण चापके अकोलखेड ता. अकोट, डॉ. वैभव बाबुराव परमाले, श्रीमती संगिता दिनेश निचले, सुनिल कराळे, विवरा ता. पातूर, डॉ. अनुप्रताप जयराज, श्रीमती सिमा वानखडे, जितेश वाडले गायगाव ता. बाळापूर, श्रीमती शालू रामदास नांदुरकर, सुनिल रामदास हरणे तळेगाव ता. तेल्हारा, डॉ. महेश केशव कावरे, श्रीमती शारदा रामचंद्र दुबे, संजय घुगे राजंदा ता.बार्शीटाकळी
आदर्श तलाठी पुरस्कार वितरण
बाळापूर तालुक्यातील तलाठी पी.एस.रानडे यांना आदर्श तलाठी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकातील सदस्य
- श्री. सुनिल कल्ले व श्री. हरीहर निमकंडे, तलाठी तहसिल कार्यालय, अकोला
- श्री. दिपीक सदाफळे व संत गाडगेबाबा आपात्कालिन पथक, पिंजर
- श्री. उमेश आटोटे व वंदे मातरम आपात्कालिन शोध व बाचाव पथक, काटेपुर्णा
- श्री. पांडुरंग तायडे व एकलव्य आपात्कालिन पथक, पोपटखेड
- प्रा. सुधिर कोहचाळे व प्रिंसिपल ब्रिगेड एन.एस.एस. आपत्ती व्यवस्थापन पथक, आरएलटी महाविद्यालय, अकोला
- श्री. प्रशांत सायरे, मंडळ अधिकारी, अकोट
- श्री. रहीम शाह रेस्क्यु बोट, वाहनचालक
सरळसेवा परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण
- डॉ. शितल प्रतापसिंग सोळंके, नियुक्तीचे पद- शरीरविकृती शास्त्रज्ञ(गट-अ)
- डॉ. मनिष मदनलाल शर्मा, नियुक्तीचे पद- जिल्हा आरोग्य अधिकारी(गट-अ)
- श्री. स्वप्नील अशोकराव वानखडे, नियुक्तीचे पद- राज्यकर निरीक्षक(गट-ब)
- श्रीमती. नेहा भास्कर चक्रनारायण, नियुक्तीचे पद- राज्यकर निरीक्षक(गट-ब)
- श्री. अभिजीत चंद्रकांत उप्पाल्वर, नियुक्तीचे पद- राज्यकर निरीक्षक(गट-ब)
- श्री. वैभव रामदास पाखरे, नियुक्तीचे पद- राज्यकर निरीक्षक(गट-ब)
- श्री. सैय्यद सादिल अली, नियुक्तीचे पद- भूकरमापक तथा लिपीक(गट-क)
- श्री. भुषन समाधान महल्ले, नियुक्तीचे पद- भूकरमापक तथा लिपीक(गट-क)
- श्री.स्वप्नील विलासराव पागृत, नियुक्तीचे पद- भूकरमापक तथा लिपीक(गट-क)
- श्री. विवेक जगन्नाथ तळोकार, नियुक्तीचे पद- भूकरमापक तथा लिपीक(गट-क)
- श्री. आकाश नागोगाराव इंगळे, नियुक्तीचे पद- भूकरमापक तथा लिपीक(गट-क)
- श्री. आदित्य दिलीप आगळे, नियुक्तीचे पद- भूकरमापक तथा लिपीक(गट-क)
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ‘मेन जेंडर सेनसेटीव्ह रोल मॉडेल’ सत्कार
- श्री. धनराज काशिराम भवाने, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी
- श्री. नरहरी रामकृष्ण मुळे, पोही ता. मुर्तिजापूर
- श्री. किरण भास्कर ठाकरे, गांधीग्राम ता. अकोला
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत व त्यानंतर लगेचच राज्यगीत झाले.या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण तसेच सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000000