सैन्य भरती रॅलीच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
5

औरंगाबाद, दि. 8 (जिमाका) : सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या Online CEE परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी आर्मी रिक्रुंटमेंट ऑफिस, छावणी मैदान येथे 25 जून रोजी आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.

यावेळी सेना भरती संचालक कर्नल प्रविणकुमार एस., जिल्हा सैनिक अधिकारी मेजर (निवृत्त) श्रीमती सय्यदा फिरासत, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात. भरतीच्या ठिकाणी आरोग्य पथक, Quick Response Team  तैनात करण्यात यावे. ह्या भरतीसाठी लागणारे मनुष्यबळ तसेच इतर संसाधने उपलब्ध करुन देण्याचे देखील निर्देश श्री पाण्डेय यांनी दिले.

प्रक्रियेबाबत

ही भरती प्रक्रीया औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी आहे.  ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी www.Joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करावेत. वैध प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच रॅलीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. भरतीप्रक्रीये दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बस सोडलेल्या आहेत.

 

भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

S.NO RALLY  DATE DISTRICT CATEGORY TRADE
A 25 Jun 2023 Aurangabad Aginveer General Duty (All Arms)
B 26 Jun 2023 Jalgaon Aginveer General Duty (All Arms)
C 27 Jun 2023 Jalna & Nanded Aginveer General Duty (All Arms)
D 28 Jun 2023 Buldana Aginveer General Duty (All Arms)
E 29 Jun 2023 Hingoli & Parbhani Aginveer General Duty  & Tradesmen ( 8 & 10 Passed )(All Arms)
  29 Jun 2023 Aurangabad, Buldana, Jalgaon, Jalna &Nanded Aginveer  Tradesmen) ( 8 & 10 Passed )(All Arms)
F 30 Jun 2023 Aurangabad, Buldana, Hingoli,Jalgaon, Jalna, Nanded & Parbhani Aginveer Technical & Clerk/ Store Keeper Techincal )

(All Arms)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here