मुंबई, दि. १४: मुंबई येथे उद्या दि. १५ ते १७ जून २०२३ या कालावधीत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. विधिमंडळाचे महत्त्व, लोकप्रतिनिधींचे योगदान, संविधानिक मूल्य अशा विविध विषयांवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विस्तृत माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, उद्या गुरुवार दि. १५ जून आणि शुक्रवार दि. १६ जून २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
००००