जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे आदेश

यवतमाळ, दि १५ जून :- जिल्ह्यातील सर्व स्तरातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळा व अंगणवाडी यांच्या इमारती सुद्धा चांगल्या असणे आवश्यक आहे. मोडक्या, गळक्या, पडायला आलेल्या, धोकादायक इमारतीत शिकण्याची विद्यार्थ्यांची सुद्धा इच्छा होत नाही. शाळेच्या इमारती बोलक्या व विद्यार्थ्यांचे मन गुंतुन राहील अशा कराव्यात. यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व शाळा  दुरुस्ती करण्यासाठी किती निधी लागणार याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचना अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्यात.

शहरी व ग्रामीणच्या अंगणवाड्याबाबत व शाळांबाबत  एक प्रस्ताव सादर करावा. नवीन आदर्श शाळा बांधण्याबाबतचा एक प्रस्ताव सुद्धा सादर करावा अशा सुचना पालकमंत्री राठोड यांनी  जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिल्यात. शाळा दुरुस्तीची कामे कश्या पध्दतीने झालीत? यासाठी संबंधित अधिका-यांनी कामावर भेट दिली पाहिजे, अधिकारी जाऊ शकत नसतील तर खालच्या कर्मचाऱ्यांना तरी पाठवायला पाहीजे अशा सुचनाही पालकमंत्री यांनी दिल्यात.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या कामाचा व खर्चाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सुचना केल्यात.या बैठकिला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यककारी अधिकारी विनय ठमके तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त अनुदान व खर्च याची माहिती घेताना बांधकाम विभागाला  ४१० कामापैकी केवळ ५५ कामे पुर्ण झाल्याबाबत विचारणा केली. प्राप्त अनुदान या वर्ष  अखेरिस पूर्ण खर्च होण्यासाठी नियोजन करण्याच्या सुचना दिल्यात.

शिक्षणाधिकारी यांनी शाळा खोल्यांना पैसे दिले, त्या बांधकामावर लक्ष असले पाहिजे शाळा खोल्याचे बांधकाम कसे करत आहे, दहा फुटावर खिडक्या आहेत  व अंगणवाडीत जाणारा मुलगा हा दहा फुटाच्या खिडकीतून कसा बघणार आहे? शाळा आणि अंगणवाडी यांच्या बांधकामाबाबत एक वेगळा आढावा घ्यावा.

बांधकामाबाबत जे चांगले काम झाले आहे त्याबाबत विभागाने सादरीकरण द्यायला पाहिजे.  शाळा दुरुस्ती आणि अंगणवाडी दुरुस्ती याला काही मर्यादा आहे का असेही त्यांनी विचारले. शाळा दुरुस्तीमधील सगळी कामे झाली पाहिजे. मला पंधरा दिवसात शाळा अंगणवाडी दुरुस्ती याबाबत झालेल्या कामाचे फोटो व प्रेझेंटेशन द्यावे.ज्या शाळा दुरुस्तीसाठी निधी देतो त्या निधीतून शाळांचे योग्य बांधकाम होत आहे की नाही याचा आढावा घेता  की नाही? याची माहिती   पंधरा दिवसांत देण्याबाबत सुचना दिल्या.

शिक्षण अधिकारी, डी.एच.ओ, बांधकाम यांनी जबाबदारी निश्चित करावी. ८ कोटी 59 लाख बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी दिलेला आहे. त्याच धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने निधी घेतला आहे. कामासाठी निधी कमी पडू देणार नाही पण दिलेला निधीचे योग्य नियोजन करून बांधकाम झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्तक्त केली. शाळेच्या दुरुस्तीबाबत मला प्रेझेंटेशन द्यावे आठ-दहा दिवसात नवीन बांधकाम खोल्या दुरुस्ती दुरुस्तीच्या आधीचे फोटो व दुरुस्ती झाल्यानंतर चे फोटो दाखवावे. दिलेल्या निधीतून कोणती-कोणती कामे झाली, तालुक्यातील कोणत्या शाळेचे बांधकाम करण्यात आले, व कसे? वर्ग खोल्या शौचालय उद्दिष्ट साध्य करण्याच्या सुचनाही त्यांनी बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाला दिल्यात.

सिंचन विहिरींचा आढावा घेताना पालकमंत्री यांनी शेतक-यांना सिंचनाची सुविधा उपलब्ढ करुन देऊन त्याच्या उत्पन्नात वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश होता, मात्र विहिरींची कामे वेळेत पूर्ण होत नसतील तर शेतक-यांचे उत्पन्न वाढणार कसे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिंचन विहिरींची कामे यावर्षात पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. 609 पैकी 391 विहरी पूर्ण झाल्यात कामातेअ उर्वरित विहिरींचे काय? अशी विचारणा त्यांनी केली. त्याचसोबत विहिरींना वीज कनेक्शन देण्यात यावे. त्याबबतची संपूर्ण माहिती देण्यात यावी.

लाभार्थ्याला वीज देणे हे आपले उद्दिष्ट असायला पाहिजे. वीज कनेक्शन मिळाले की नाही तसा आढावा घेऊन खात्री करून  माहिती द्यावी.  या योजनेबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा माहिती पुरवावी असेही पालकमंत्री यांनी सांगितले.

पारधी वस्ती विकास 2021-22चा निधी

साडेसात लाख रुपये शिल्लक का राहीले याबाबत विचारणा केली. महिला व बाल विकास भवनाचा आढावा घेण्यात आला. प्रस्ताव पाठवला असेल तर त्यासाठी निधी लवकर उपलब्ध करून देण्यात येईल.  महिला व बाल विकास भावनांचे काम लवकर मार्गी लावावे अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्यात.

०००