उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वीर जवान सूरज यादव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

सातारा, दि. २२ – येरवळे, ता. कराड येथील अमर जवान सूरज मधुकर यादव यांचा दिमापूर, नागालँड येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे  सांत्वन केले.

यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

०००००