नियोजनबद्ध आणि पारदर्शक धोरणामुळे विदेशी गुंतवणुकीत राज्याचा पहिला क्रमांक – उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह

0
10

मुंबई, दि. २८ : भारत विदेशी गुंतवणुकदारांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून वेगाने उदयाला येत आहे. नियोजनबद्ध व पारदर्शक धोरणामुळे राज्यात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आली आहे. यामुळे देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे, असे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले.

राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उद्योग विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांतर्गत विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. २०२२-२३ या वर्षांत महाराष्ट्रामध्ये १ लाख १८ हजार कोटींची सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. राज्यात विदेशी गुंतवणुकदारांसाठी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय तसेच विदेशी गुंतवणुकीत राज्याला मिळालेल्या या यशाबद्दल उद्योग विकास आयुक्त श्री. कुशवाह यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

ही मुलाखत गुरूवार, दि. 29, शुक्रवार दि. 30 जून  2023 आणि शनिवार दि. 1 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि. 3 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा.  महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here