Tuesday, October 3, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !

Team DGIPR by Team DGIPR
July 5, 2023
in विशेष लेख
Reading Time: 1 min read
0
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर देण्यात येत आहे. राज्यातील सुक्षिशित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा व उद्योग उभारणीतून ते स्वावलंबी व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मागील एक वर्षाच्या कालावधीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य शासनाच्यावतीने ‘सर्वाना रोजगार’ यामध्ये राज्यात 75 हजार पदांसाठी भरती वेगाने सुरु आहे. तसेच शासन सेवेत पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत परीक्षा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 12 हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर, एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम, आता असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ, करोडो कामगारांना दिलासा असे अनेक विविध कल्याणकारी निर्णय घेवून सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होवून ते आत्मनिर्भर व्हावेत. त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प शासनाच्या आर्थिक सहाय्यातून उभारणीसाठी  आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाची  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना लाभदायक आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात 12 हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले आहेत. याच योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील कलावतीनगर वाडी (बु) नांदेड येथे शुभ्रा इंडस्ट्रीज लाकडी घाणा खाद्यतेल उत्पादन उद्योग विस्तारीकरण करण्यात आला आहे. फार्म्स ओशन या नावाने खाद्य तेलाचे ब्रॅड तयार करण्याचा व्यवसाय संदीप प्रल्हाद बेहरे यांनी उभारला आहे. रिफाइंड तेलाचे आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्पपरिणाम होत असल्याने त्यांना लाकडी घाणा तेल तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांच्या प्रकल्पाची किंमत 10 लाख 54 हजार एवढी आहे. या व्यवसायातून ते वर्षाला 30 लाख रुपयांची उलाढाल करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 1 पुरुष व तीन महिलांना अर्धवेळ काम देवून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

सुरूवातीला लातूर, सातारा व कोल्हापूर येथील लाकडी घाण्याचे तेल उत्पादकासाठी प्रसिध्द असलेल्या उद्योजकांसोबत त्यांनी समन्वय साधला. यात त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी रचिता बेहरे यांचा कृतिशील सहभाग आहे.  संदीप बेहरे यांनी प्रथमत: स्वखर्चाने कोयम्बतूर येथून 2 लाख 90 हजार रुपयांना एक लाकडी घाणा मशिन विकत घेवून हा व्यवसाय पारंपारिक पध्दतीने सुरु केला. लाकडी घाण्यातून ते खोबरे, शेंगदाना, करडी, सुर्यफूल, जवस, मोहरी, बदाम, तिळाचे असे विविध प्रकारचे तेल काढतात. हा उद्योग उभारताना सुरवातीला त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी सर्वेक्षण करुन संबंधित तंत्रज्ञानाबाबत जाणून घेतले. तेलाचा घाणा मशिन कोणते घ्यावे, कुठून घ्यावे याबाबत माहिती मिळविली. कच्चा माल दर्जेदार उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना भेटी घेतल्या. शेतकऱ्यांचा कच्चा माल जागेवरच खरेदी केला. व्यापाऱ्याची मध्यस्थी न ठेवता थेट शेतकऱ्यांपासून कच्चा माल खरेदी केल्यामूळे शेतकऱ्यांला फायदा झाला. उद्योग उभारताना जागेच्या उपलब्धतेसाठी आलेल्या अडचणीवर मात करून बेहरे यांनी आपला हा उद्योग उभा केला.

संदीप बेहरे यांनी अगोदरच व्यवसायात स्वत: जवळचे पैसे गुंतविलेले असल्यामुळे, त्यांना व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक चणचण भासत होती. यात त्यांनी हार मानली नाही. यातून मार्ग काढत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालयास त्यांनी संपर्क साधला. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया, गुरुद्वारा शाखा, नांदेड यांच्याकडून व्यवसाय विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले. या रकमेतून चार यंत्र खरेदी केले. त्यामुळे त्यांचा आर्थिक प्रश्न सुटला. या रकमेतून त्यांनी व्यवसायासाठी कच्चा घाणा, करडी दाळ मशिन, ऑईल फिल्टर, बॉयलर इ. यंत्र खरेदी केले.

शुभ्रा इंडस्ट्रिज मार्फत त्यांनी ‘फार्म्स ओश’ नावाचा बँन्ड त्यांनी विकसित केला. नांदेड व नांदेड बाहेरील अनेक कुटूंब या लाकडी घाण्याच्या तेलास प्राधान्य देत आहेत. तेल निर्मिती कशी करता, प्रमाण काय असते याबाबत  संदीप बेहरे सांगतात की, घाण्यातून तेल काढण्यासाठी 15 किलो शेंगदाने 110 रुपये प्रमाणे विकत घेतले तर त्यापासून जवळपास 7 किलो शेंगदाना तेल तयार होते. शेंगदाना तेल ते 290 रुपयेप्रमाणे विक्री करतो. तेलबियांपासून तेल बनविल्यानंतर उर्वरित राहिलेल्या पदार्थापासून ते जनावरांना खाण्यासाठी खल्ली (पेंड) तयार करतात. ही जनावरांना खाण्यासाठी पेंड 40  रुपये किलोप्रमाणे विक्री करतात. त्यापासूनही त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. या सर्व उत्पादनापासून मासिक उलाढाल अंदाजे 1 लाख 25 हजार रुपये आहे असे ते सांगतात. या व्यवसायाच्या माध्यमातून इतर 4 जणांना रोजगार देत आहोत याबाबत बेहरे यांनी समाधान व्यक्त केले.  जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघुउद्योजकांना चालना देवून लोकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून बळ दिले जात आहे. संदीप प्रल्हाद बेहरे यांनी उद्योग उभारणीसाठी यशाचे श्रेय हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेस देवून महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभारही मानले आहेत.

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

Tags: यशकथा
मागील बातमी

वेगवान निर्णयांमुळे जिल्ह्याचा विकास गतिमान विकासकामांसोबतच योजनांच्या अंबलवजावणीत जिल्हा अग्रेसर

पुढील बातमी

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुढील बातमी
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Sep    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 9,438
  • 13,683,620

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.