‘दिलखुलास’ कार्यक्रमात १५, १७, १८ जुलैला मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 14 : पावसाळ्यात मुंबईमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी समन्वय करून नियोजन करण्यात आले असल्याचे संचालक महेश नार्वेकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख भाग असून यामध्ये बचाव, शोध आणि शून्य मृत्यू हे महत्त्वाचे  उद्दिष्ट आहे. पीडितांना आपत्कालीन काळात मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून त्वरित प्रतिसाद देण्यात येतो. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येतो. शासन-प्रशासन यंत्रणेच्या जोडीने मुंबई महापालिकेमार्फत आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात सूक्ष्म नियोजन करून कोणकोणती कामे करण्यात येतात तसेच कोणती खबरदारी घेण्यात येते, याबाबतची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.15, सोमवार दि.17 आणि मंगळवार दि. 18 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.   ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 18 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR