मुंबई दि. २० :- रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहन चालवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले आहे.
रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चलान कारवाई झाली असेल तर ते जाणून घेण्यासाठी आणि ई-चलानचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलान संदर्भात काही तक्रार असल्यास नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावर कशी खबरदारी घेण्यात येत आहे, याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. सिंगल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि. 21, शनिवार दि.22, सोमवार दि. 24 आणि मंगळवार दि.25 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
000