राजधानीत ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत ‘पंचप्रण शपथ’ चे आयोजन

नवी दिल्ली 9 : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान आज, 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात  पंचप्रण शपथ घेण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात निवासी आयुक्त श्री.रुपिंदर सिंग यांनी ‘भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करु. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करण्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु’ ही पंचप्रण शपथ उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्रात प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी  उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ  दिली.

राज्यात ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत विविध उपक्रम आयोजित केले जातील.  देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

००००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.147 / 09.08.2023