‘महाआरोग्य शिबिरां’चा गरजूंना होतोय लाभ – मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

0
6

मुंबई, दि.12- जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या आरोग्य विषयक तक्रारींच्या निवारणार्थ महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मोफत तपासणीचा लाभ स्थानिक नागरिकांनी घ्यावा. तसेच आपल्या ओळखीच्या व्यक्तींनासुद्धा याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयीसुविधा आणि तक्रारींच्या निवारणासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून ‘महाआरोग्य शिबीरांचे’ आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज महापालिकेच्या डी, सी आणि इ वॉर्डमध्ये नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भायखळा (पश्चिम) येथील कांजरवाडा येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या “इ” विभाग आणि ताडदेव संकुल, बी एम सी शाळा, तुळशीवाडी, “डी” विभागात सुरु झालेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री श्री.  लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराद्वारे प्राथमिक आरोग्य चाचण्यांसह नागरिकांना मोफत औषधे सुद्धा उपलब्ध होणार आहेत. यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी विभागाकडून लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here