मुंबई, दि. 14: राज्यात सध्या डोळे येणे या आजाराची साथ सुरू आहे. डोळे येऊ नये म्हणून तसेच डोळे आल्यावर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वर्षा रोकडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.16, गुरूवार दि. 17 आणि शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
००००
जयश्री कोल्हे/स.सं